Monday, May 20, 2019






मातृभाषेतील शिक्षण

मूल हे प्रत्येकाच्याच हृदयाची गोष्ट असते. त्यामुळे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट निवडताना आपण खूप काळजी घेतो. खरं तर आजकाल मूल जन्माला येण्याआधीच त्याच्या शिक्षणाचा विचार सुरू होतो. अर्थात यात गैर  काहीच नाही आणि तो विचार करायला देखील हवा. मुलांना कोणत्या माध्यमात शिकवावे याचं स्वातंत्र्य तर प्रत्येक पालकांना आहेच परंतु मातृभाषेत का शिकवावे यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न.

भाषा आणि माध्यम:

मुळात भाषा आणि माध्यम या दोन गोष्टींमध्ये लोक खूप गल्लत करतात. भाषा हे संवादाचे माध्यम आणि माध्यम हे शिक्षणाने समृद्ध होण्याचे माध्यम आहे. भाषा कधीच ज्ञानाचा अडसर बनत नाही. जर तसं असेल तर जपान आणि चीन आज तंत्रज्ञानात अग्रेसर दिसले नसते कारण त्यांची शिक्षणव्यवस्था ही त्यांच्या मातृभाषेतूनच चालते. आपल्याकडे इंग्रज तर सोडून गेले पण जाताना मात्र काही बीजं रोवून गेले आणि आज त्याचीच मुळे खोलवर रुजून वटवृक्षात रुपांतरीत होताना दिसत आहेत कारण सध्या इंग्रजी माध्यमाचं पेव फुटताना दिसत आहे. लोकही  मेंढ्या जसं कळपासोबत चालतात तसं चालायला शिकलेत नाहीतर त्यांना हरवण्याची भिती वाटते. आज जवळपास ८० टक्के पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकविण्याचा अट्टाहास करताना दिसतात. पण हा अट्टाहास चुकीचा आहे की बरोबर हे तपासून पाहायला हवे. खरं म्हणजे इंग्रजीच नव्हे तर इतर कोणत्याही भाषेस विरोध नाही. इंग्रजी ही तर जागतिक भाषा त्यामुळे तर ती आलीच पाहिजे आणि शिकलीच पाहिजे परंतु त्यासाठी माझ्या पाल्याला इंग्रजी माध्यमातच घातले पाहिजे हा चुकीचा विचार रुजताना दिसत आहे.

माध्यम निवडीचा मानसिक संभ्रम:

माणूस हा जसा समाजप्रिय आहे तसाच तो तुलनाप्रिय ही आहे. "माझ्या शेजारच्यांचा मुलगा इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतो, काय फाड फाड इंग्रजी बोलतो. मी पण इंग्लिश मिडीयम मध्येच घालणार माझ्या मुलाला" ही झाली सामाजिक तुलना. "मी बारावीत असताना ते इंग्रजीतील सायन्स काय भयानक अवघड गेलं मला, नको रे बाबा, माझ्या मुलांना तर मी इंग्रजीतच शिकवणार." ही झाली वैयक्तिक तुलना. आपण कमी पडतो कारण आपण वैचारिक तुलनाच करत नाही. माझा एक साधा प्रश्न आहे. आता आपण बहुभाषांकडे वळत आहोत आणि ही चांगली गोष्ट आहे. मग जर तुम्हाला जपानी भाषा शिकायची असेल तर तुम्ही काय करता, त्या भाषेचे प्रशिक्षण घेता आणि त्याचे ज्ञान मिळविता. मग उद्या जर इंग्रजी भाषेऐवजी जपानी भाषेला महत्व आले तर तुम्ही तुमच्या मुलांना जापनीज बालवाडीत घालणार आहात का? माणसाच्या मेंदूत अनेक भाषा शिकण्याची तरतूद निसर्गानेच करून ठेवली आहे. त्यामुळे कोणतीही भाषा तो सहजपणे शिकू शकतो. आता फक्त आपल्याला ठरवायचं आहे की मला माझ्या पाल्याला भाषसमृद्ध बनवायचं आहे की ज्ञानसमृद्ध बनवायचं आहे. थोडक्यात इंग्रजी बोलणारे पोपट तयार करायचे आहेत की स्वबळावर आकाशात स्वच्छंद भरारी घेणारे गरुड निर्माण करायचे आहेत. इंग्रजी फाड फाड बोलता आले म्हणून तुमच्या मुलांना कोणीही सायंटिस्ट ची जागा देणार नाही, कोणीही वैमानिकाची जागा देणार नाही, गायकाची जागा देणार नाही. हे फक्त त्याला त्याच्या कौशल्यावरच मिळणार आहे ही गोष्ट विसरता कामा नये.

इंग्रजी माध्यमाला महत्व का आले?

इंग्रजी भाषेला इतके महत्व येण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले कारण म्हणजे इंग्रजी ही कामाची, रोजगाराची भाषा बनली. नवीन येणारे प्रत्येक तंत्रज्ञान इंग्रजीतून सहज उपलब्ध होते आणि मग ते शिकण्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक बनत गेली. दुसरे कारण म्हणजे भारत हा विविध संस्कृती आणि भाषांनी नटलेला देश त्यामुळे अनेक लोक कामानिमित्त स्थलांतरित होतात. सध्या महाराष्ट्रात तर स्थानिकांपेक्षा स्थलांतरित लोकसंख्याच जास्त दिसून येते. आणि मग जर एखादी व्यक्ती तमिळ असेल तर ती तमिळ माध्यमाचा आग्रह धरू शकत नाही; गुजराती व्यक्ती गुजराती माध्यमाचा आग्रह धरू शकत नाही. मग यावर उपाय काय तर अशी भाषा निवडा जी ग्लोबल आहे आणि सर्वपरिचित आहे. यातूनच मग हळूहळू इंग्रजी माध्यमांचा विस्तार होत गेला. तुम्ही इंग्रजी माध्यमात प्रवेश का घेता याबद्दल तुमचा निर्णय ठोस असावा जसे की आंतरजातीय विवाह झाल्यामुळे भाषा निवडीचा प्रश्न उभा राहतो म्हणून..जवळपास चांगली शाळा उपलब्ध नाही म्हणून..स्थलांतर झाले म्हणून.. इत्यादी. परंतु आजकाल मला आजूबाजूला स्पर्धा दिसते, प्रतिष्ठा दिसते. त्यामुळे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ही प्रतिष्ठाच. 'मी मोठ्या कंपनीत आहे किंवा मोठ्या पदावर आहे मग माझी मुलं मोठ्या शाळेतच म्हणजे इंग्रजीतच शिकली पाहिजेत. (यातही इन्फ्रास्ट्रक्चरच्या मोहाला बळी पडणारे वेगळेच) नाहीतर लोक काय म्हणतील वगैरे वगैरे.' या सर्व गोष्टींतून बाहेर येऊन नीट विचार केला तर लक्षात येईल की, या सर्व गोष्टींना आपणच कारणीभूत आहोत.

माध्यम प्रवेश:

इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणजे दिवस-दिवस रांगा, ऑनलाईन फॉर्म, मुलाखत अशा एक ना अनेक चाळणी परीक्षेतून पास होऊन मग मुलाचा प्रवेश होतो. मध्यंतरी माझ्या एक ओळखीचे सांगत होते की मुलीला ऍडमिशन साठी ४ लाख भरले. खरं तर ६ लाख भरायला सांगितले होते पण ओळखीमुळे ४ लाख भरले. ही गोष्ट ते अगदी कौतुकाने सांगत होते. मला मात्र ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट वाटली कारण सुशिक्षित आई वडील A,B,C,D..शिकविण्यासाठी इतके पैसे भरत असतील तर त्यांना अर्थकारण किती समजले माहीत नाही किंवा पैशापेक्षा प्रतिष्ठा मोठी वाटत असावी. इथे लोक एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की, १०वी पर्यंत सर्व जण एकसारखेच प्राथमिक शिक्षण घेत असतात. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाची दिशा बदलते. त्यामुळे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणावर किती खर्च करायचा याचे गणित बांधता आले पाहिजे.

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व:

माझी मातृभाषा मराठी आणि मी मुळची पुण्याची त्यातही पेठेत वाढलेली त्यामुळे थोडसं हक्कानेच सांगायला आवडेल की मराठी माध्यमचं का निवडावे. जागतिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर अनेक शास्त्रज्ञांनी हे नेहमीच पटवून दिले आहे की, मातृभाषेतील शिक्षणामुळे मुले गोष्टी लवकर आकलन करतात. मराठी माध्यमात घालताना मराठी बाणा, मराठी संस्कार, संस्कृती, अभिमान म्हणून घालू नका तर शास्त्रीय दृष्ट्या आणि बालमानसशास्त्राचा विचार करून मग घाला. आमच्या मुलाला शाळेत घालताना, आम्हाला हा प्रश्नच पडला नाही की त्याला कोणत्या माध्यमात घालायचे कारण मूल जन्माला येण्याआधीच आमचं ठरलं होतं की त्याला मराठी माध्यमातच घालायचं आणि आज घेतलेल्या निर्णयाचा अतिशय आनंदच होतो. एक तर शाळेत गेल्यावर त्याला कोणतीही नवीन भाषा शिकून मग ज्ञान ग्रहण करण्याचा त्याचा ताण कमी झाला. दुसरा फायदा मला शिक्षणतज्ञ डॉ. अनंत देशमुख यांच्या व्याख्यानातून समजला तो म्हणजे ५ वी, ८ वी आणि १० वी साठी जी प्रज्ञा शोध परीक्षा असते ती फक्त मराठी माध्यमासाठीच आहे. आणि या परीक्षेचे महत्व इतके आहे की जर तुम्ही भविष्यात UPSC परीक्षेची मुलाखत देणार असाल तर त्यामध्ये देखील या परीक्षेसाठी एक गुण राखीव असतो. तिसरा फायदा मला शिक्षणतज्ञ डॉ. श्रुती पानसे यांच्यामुळे कळाला. तो म्हणजे इंग्रजी माध्यमातील मुलांमध्ये दिसून येत असलेला वाढता ताण. एखादे सुंदर चित्र बाईंनी वर्गात दाखविले आणि ते कसे आहे विचारल्यानंतर काही मुलांच्या ओठावर पटकन येतं की, 'किती सुंदर आहे हे' परंतु जर शाळेमध्ये तीन वेळाच मातृभाषेतून बोलण्याची परवानगी आणि त्यानंतर मात्र शिक्षा असेल तर मुलं गप्प बसतात, प्रतिक्रियाच देत नाही आणि हळूहळू विचार करणंच सोडून देतात. आणि हे मुलांसाठी तर घातक आहेच पण समाजहितासाठी सुद्धा घातकच आहे. कोवळ्या वयात जेव्हा हस्त नेत्र समन्वय सुध्दा नीटसा तयार झालेला नसतो तेव्हा या मुलांना करसिव्ह हस्ताक्षरासाठी प्रवृत्त केले जाते आणि नाही जमलं तर शिक्षा किंवा घरी आल्यावर ओरडा किंवा मार यामुळे सुद्धा मुलांची मानसिकता बदलते. सखोल विचार केला तर अशा एक ना अनेक गोष्टी उलगडतील.

मातृभाषा शिक्षणाचा नवोदय:

जगातील १९२ देशांपैकी १८६ देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. विचारबदलाचे नवीन पडसाद उमटताना दिसत आहेत कारण जवळपास ४००० मुलांनी इंग्रजी माध्यम बदलून मराठी माध्यमात प्रवेश घेतला. पुण्यात सध्या एका शाळेत ५० मुलांची एक आख्खी तुकडी वाढविण्यात आली. दर्जा निर्माण करण्याची इच्छाशक्ती आणि व्यवस्थापन असेल तर शिक्षणपद्धतीचे किती सुंदर चित्र उभे राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्रापूर येथील वाबळेवाडी जिल्हापरिषदेची शाळा. या शाळेने देश पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. डॉ. विजय भटकर यांनी माझ्या स्वप्नातील शाळा असा उल्लेख केला आहे. शिक्षणाची भाषा मराठी परंतु शिकविण्याचा दर्जा जागतिक पद्धतीचा. आज या गावाची लोकसंख्या १२०० च्या आसपास आणि शाळेत मुले जवळपास ९५० कारण आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा या जिल्हापरिषदेच्या शाळेसाठी रांगा लावतात. हे परिवर्तन फक्त शिक्षक आणि गावकरी यांच्यामुळेच शक्य झाले. सध्या काही पालक मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी घर बदलण्याची ही तयारी दाखवत आहेत आणि म्हणूनच मला येथे मातृभाषा शिक्षणाचा नवोदय असं म्हणूशी वाटतं.
या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे पण शेवट करताना काही नावे आवर्जून घ्यावीशी वाटतात ती म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव,डॉ. जयंत नारळीकर, डॉ.विजय भटकर इ. अशी अनेक नावे  आहेत ज्यांनी त्यांचे शिक्षण मातृभाषेतूनच घेतले परंतु आज राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते सन्मानाने काम करत आहेत. आपण आपल्यातील कौशल्याने पुढे जात असतो आणि पुढे जात असताना नवीन भाषा अगदी सहज आत्मसात करू शकतो. इंग्रजी भाषा उत्तम शिकाच पण त्यासाठी  माध्यमाचा आग्रह नसावा. बहुभाषा प्रशिक्षणावर आधारित मातृभाषेतील शिक्षणावर भर कसा देता येईल यावर विचार आणि कृती झाली पाहिजे. जाता जाता युनेस्कोच्या माजी डिरेक्टर जनरल एरिना बोकोवा यांनी मांडलेले विचार- "Mother languages in a multilingual approach are essential components of quality education, which is itself the foundation for empowering women, men and their societies."


©  ज्योती कणसे - मालुसरे, पुणे.

Sunday, January 20, 2019

Swami Vivekananda!


Swami Vivekananda

I am very happy to write about India’s eminent personality and my ideal Swami Vivekananda in my first blog. There are many books, many Google pages and many YouTube videos are available on Swami Vivekananda, but here I would like to express Swamiji through my perception in few words.

The name is enough to motivate our young generation and that is Swami Vivekananda. Though they are not present in this world, they always walk with me with their thoughts and blessings. As we know that Swamiji was born on 12th January 1863 and died on 4th July 1902. In this very short span of their life (Only 39 years), they have contributed more to the society with dedication in the work of yoga, meditation, education, character building, nation building and the list is endless.

He was the perfect combination of spirituality and education. More than 100 years before, they have written about education in a very deep sense and that famous quote is- “Education is the manifestation of perfection already in man.” How beautifully they have written about character- “Neither money pays, nor name, nor fame, nor learning; it is CHARACTER that can cleave through adamantine walls of difficulties.” There are too many quotes and thoughts are available of Swamiji but we must have to rethink on the philosophy of Swami Vivekananda that is- “Man making is my mission.” and it is the real requirement of today’s world.

Words are less to speak and write about Swamiji but I would like to conclude my article with these two questions and answers.


What they taught me?
They taught me politeness, positive attitude, perseverance, perfection, patience and purity also they taught me to make introspection of ourselves in any situation; whether it is bad phase or good phase.

What they gave me?
They gave me only one thing and it is the Peace. Ultimately the every human being is in the search of his divine destiny and that is only the Peace, not name, fame & money.



©  ज्योती कणसे - मालुसरे, पुणे.

मातृभाषेतील शिक्षण मूल हे प्रत्येकाच्याच हृदयाची गोष्ट असते. त्यामुळे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट निवडताना आपण खूप काळजी घे...